जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आज गोदावरी नदीची पाहणी केली. लवकरच गोदावरी नदी प्रदूषण संदर्भात ठोस उपाययोजना करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
गोदावरी नदीपात्रातील कचरा तात्काळ काढण्याचे आदेश यावेळी मुंढे यांनी दिले. येत्या महिनाभरात नदीपात्रतातील कचरा आणि पानवेली काढण्यात येणार असल्याचे सुद्धा मुंढे यांनी यावेळी सांगितले.
गेल्या अनेक वर्षपासून गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा कायम आहे आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर गोदावरी नदी प्रदूषणातून मुक्त करण्याचा एक मोठा आव्हान मुंढे यांच्या समोर असल्याचं बोल जात होता त्यानुसार गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्या संदर्भात पहिला पाऊल आज मुंढे यांनी उचला आहे आणि येणाऱ्या काही महिन्यात नदीला कायमस्वरूपी कसं प्रदूषणमुक्त केलं जाईल या संदर्भात नक्कीच ठोस उपाययोजना केल्या जातील यावर काम करणार असल्याचे सुद्धा मुंढे यांन सांगितलं.