Tukaram Munde FDA Action: तुकाराम मुंढेंचा दणका! पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त

अशातच आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने या घटनेचा तपास केला आहे. 

Tukaram Munde FDA  Action: तुकाराम मुंढेंचा दणका! पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त

पुण्यात विषारी दारूच्या सेवनाने तब्बल 22 जणांचा बळी घेतला. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नफा कमावण्याच्या हव्यासापोटी ही विषारी दारू तयार करण्यात आली आणि ती सर्वत्र विकली गेली. यामुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अशातच आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने या घटनेचा तपास केला आहे. 

अशातच आता एफडीएचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर भिवंडीत मिथेनॉलचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. फडीएच्या विशेष पथकानं भिवंडी परिसरातील 'मे. रेक्स इंटरनॅशनल' (M/s Rex International) कंपनीच्या गोदामावर अचानक धडक छापा टाकला. या कारवाईत मानवी जिवासाठी अत्यंत घातक असलेल्या 'मिथेनॉल' (Methanol) या विषारी रसायनाचा सुमारे 5,929 किलोग्रॅमचा प्रचंड मोठा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे. 

हेही वाचा – Pune Pimpri-Chinchwad Liquor Case: पुणे पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरण! मृतांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत? 

पुण्यात विकल्या गेलेल्या दारूच्या भेसळीसाठी मुख्य रसायन याच कंपनीकडून पुरवण्यात आलं होतं. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, या अत्यंत विषारी आणि घातक द्रव्याची कोणतीही अधिकृत खरेदी-विक्रीची नोंद किंवा साठा कंपनीच्या नोंदवहीत  उपलब्ध नव्हती.

हेही वाचा – Terror Plot Foiled: देशातील विविध शहरांवर दहशतवादी हल्ल्याचा ISI चा मोठा कट उधळला; दिल्ली पोलिसांकडून 9 जण गजाआड 

अधिक नफा कमवण्यासाठी या रसायनाचा वापर करून हातभट्टीची दारू बनवण्यात आली आणि ती वेगवेगळ्या अड्ड्यांवर विकली गेली, ज्याने 22 जणांचा बळी घेतला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number