Middle East War: इराणला झुकवण्यासाठी ट्रम्प यांची रणनीती! सीजफायरचा काउंटडाउन सुरू; खरंच युद्धाचा क्लायमॅक्स जवळ की…?

मात्र या संभाव्य निर्णयामुळे इस्रायलमध्ये चिंता व्यक्त केली जात असून ईरानने अमेरिकेच्या युद्धविराम प्रस्तावालाही नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

Middle East War: इराणला झुकवण्यासाठी ट्रम्प यांची रणनीती!  सीजफायरचा काउंटडाउन सुरू; खरंच युद्धाचा क्लायमॅक्स जवळ की…?

वॉशिंग्टन: पश्चिम आशियातील संघर्ष अधिक तीव्र होत असतानाच अमेरिका-इराण युद्धाबाबत एक मोठी शक्यता समोर आली आहे. इस्रायली माध्यमांच्या अहवालानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 28 मार्च 2026 रोजी इराणसोबत युद्धविरामाची घोषणा करू शकतात. हीच शक्यता सध्या इस्रायलसाठी सर्वात मोठी चिंता बनली असल्याचे सांगितले जात आहे.

इस्रायली माध्यमाच्या अहवालानुसार, अमेरिकेने अचानक किंवा एकतर्फी पद्धतीने युद्ध थांबवून इराणसोबत चर्चेचा मार्ग मोकळा करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एका वरिष्ठ इस्रायली सूत्राच्या हवालीने असे म्हटले आहे की, जर इराणकडून काही मोठी सवलत दिली गेली तर ट्रम्प तात्पुरता युद्धविराम जाहीर करू शकतात.

मात्र संभाव्य युद्धविरामाच्या बातमीमुळे इस्रायलमध्ये समाधानापेक्षा चिंता अधिक दिसून येत आहे. इस्रायलचे मत असे आहे की सध्या युद्ध निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून सैन्यदृष्ट्या वरचष्मा मिळवण्याची ही योग्य वेळ आहे. त्यामुळेच इस्रायलने अलीकडच्या काळात इराणविरुद्धचे हल्ले अधिक तीव्र केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Kerosene Distribution: रेशन कार्डवर आता मिळणार 'इतक्या' लिटर रॉकेल; गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

अहवालानुसार, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली असून संभाव्य युद्धविरामाच्या आधी इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांवर मोठा आघात करण्याची रणनीती तयार करण्यात आली आहे. काही माध्यमांनी असा दावा केला आहे की नेतन्याहू यांनी सैन्याला इराणच्या शस्त्रसाठा आणि संरक्षण यंत्रणेला मोठे नुकसान पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही.

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील सामरिक समन्वय कायम असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख लवकरच इस्रायलला भेट देणार असून पुढील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

या सर्व घडामोडींमध्ये इराणची भूमिका मात्र ठाम असल्याचे दिसून येते. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, इराणने अमेरिकेकडून पाठवण्यात आलेल्या 15 मुद्द्यांच्या युद्धविराम प्रस्तावाला नकार दिला आहे. पाकिस्तानमार्फत पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावालाही तेहरानने स्वीकारले नाही. इराणने स्पष्ट केले आहे की युद्ध समाप्तीचा निर्णय केवळ त्यांच्या अटींवरच होईल. त्यामुळे सध्या तरी या संघर्षात तातडीने तोडगा निघण्याची शक्यता कमी असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

हेही वाचा: Priyanka Chaturvedi: 'मातोश्री'वर खडाजंगी! उद्धव ठाकरेंच्या बैठकीत प्रियांका चतुर्वेदींचा संताप; संजय राऊतांवरून थेट पक्षप्रमुखांनाच सवाल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number