जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
नवी मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वेच्या ट्रॅकवरून चक्क ट्रक धावताना दिसत आहे. वाशी-उरण या नविन रेल्वे ट्रॅकचे काम सध्या सुरू आहे. या रेल्वे रूळाच्या कामासाठी चक्क ट्रकचा वापर करण्यात येत आहे.
ट्रक हा रस्त्यावर चालतो परंतू रूळाचे काम करण्यासाठी रेल्वेच्या ट्रॅकवर ट्रक धावताना दिसतोय.
रेल्वेच्या ट्रॅकवरून तुम्ही कधी ट्रक धावताना पाहिला नसेल अर्थात ते शक्यही नाही कारण ट्रक हा रस्त्यावर चालतो. मात्र, नवी मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावर चक्क ट्रक धावताना दिसत आहे.