जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
तलाक… तलाक… तलाक… या 3 शब्दांमुळे मुस्लिम महिलांचं आयुष्य उद्धवस्त होत आहे.
तोंडी तलाकला विरोध होत असताना आता तर हा तलाक फोन आणि पत्रानंही दिला जात आहे.
भारताची नॅशनल लेव्हलची नेटबॉल प्लेयर शुमेला जावेदला तिच्या पतीनं फोनवरून तलाक दिला. तर हैदराबादच्या सुमैनाला दुबईला राहणाऱ्या तिचा पती तिचा ओवैस तालिबननं व्हॉट्सअपवरच तिहेरी तलाक दिला.
तसेच सौदीतल्या एका व्यक्तीनं यूपीतल्या त्याच्या पत्नीला फोनवरून आणि त्याच्याच लगान भावानं पत्राद्वारे त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला.