तिहेरी तलाकवर बंदी असतानाही घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

तिहेरी तलाकवर बंदी असतानाही पालघरमध्ये एका मुस्लिम महिलेला तिच्या पतीने तिहेरी तलाकचं पत्र पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आहे, 20 वर्षांपूर्वी मनोर इथल्या महिलेचा वसईतल्या एका व्यक्तीशी विवाह झाला, मात्र 3 महिन्यांपूर्वी परराज्यात जायचे सांगून त्याने पत्नीला माहेरी पाठवलं. पत्नीला पुन्हा घ्यायला न आल्याने […]

तिहेरी तलाकवर बंदी असतानाही घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

तिहेरी तलाकवर बंदी असतानाही पालघरमध्ये एका मुस्लिम महिलेला तिच्या पतीने तिहेरी तलाकचं पत्र पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या विरोधात पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आहे, 20 वर्षांपूर्वी मनोर इथल्या महिलेचा वसईतल्या एका व्यक्तीशी विवाह झाला, मात्र 3 महिन्यांपूर्वी परराज्यात जायचे सांगून त्याने पत्नीला माहेरी पाठवलं.

पत्नीला पुन्हा घ्यायला न आल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी पतीच्या घरी धाव घेतली असता त्याने पीडितेला तिहेरी तलाकचं पत्र वकिलामार्फत पाठवलं आणि तिला नोटीस बजावली. 

या प्रकरणी या महिलेचा पती आणि पत्र पाठवणारा वकील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number