Nashik Trimbakeshwar Case: त्र्यंबकेश्वर मंदिरातील भाविक मारहाणप्रकरण; चौकशी समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकाकडून भाविकाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Nashik Trimbakeshwar Case: त्र्यंबकेश्वर मंदिरातील भाविक मारहाणप्रकरण; चौकशी समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

नाशिक: काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर येथे भाविकाला सुरक्षारक्षकाकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. आता या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार असून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने यासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने या घटनेची सखोल चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मागील आठवड्यात घडलेल्या या घटनेत मंदिरातील सुरक्षारक्षकाने एका भाविकाला मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाविकांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

हेही वाचा: Rupee Vs Dollar: ‘सबसे बडा रुपैया’ म्हणायचं तरी कसं? रुपयाची आज ऐतिहासिक घसरण

या प्रकरणाची माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी दिली आहे. सोशल मीडियावर या घटनेविरोधात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर नागरिकांच्या मागणीवरून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक समिती नेमून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर आता न्यायालयानेही या प्रकरणात लक्ष घालत कडक चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीसाठी तीन ते चार न्यायदंडाधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात येणार असून ते संपूर्ण घटनेचा तपास करून सविस्तर अहवाल सादर करणार आहेत. 

या चौकशी अहवालातून नेमके सत्य समोर येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांनी मंदिर प्रशासनाने भाविकांशी आदराने आणि संयमाने वागावे, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा: Vasai Fish Viral Video : वसईकरांनो, मासे खाताय तर सावधान..! मासळीवर चक्क लाल हिटची फवारणी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number