येत्या शनिवारी म्हणजेच १८ फेब्रुवारी ला महाशिवरात्री आहे. यानिमित्ताने १२ जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुंतर भाविक भक्तांसाठी महाशिवरात्रीनिमित्त देवस्थान रात्रभर खुले राहणार आहे. महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान तर्फे ट्रस्टचा निर्णय घेण्यात आला आहे.
१८ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ पासून १९ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर खुले राहणार आहे. गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाययोजना केल्या आहेत. भाविकांकरता गर्भ ग्रह दर्शन बंद राहणार असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात येणार आहे. भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे.
देणगी दर्शन दिवसभर सुरु राहणार असून देणगी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुविधांनी युक्त भव्य दर्शन मंडप देखील उभारला आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे तीन दिवसांकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.