वसईत ‘आईचे झाड’ वृक्षारोपण

सामाजिक कार्यकर्त्यांनी आईचे झाड ही संकल्पना राबवून वसईत ठिकठिकाणी वृक्षारोपण केले.

वसईत ‘आईचे झाड’ वृक्षारोपण

वसई : सामाजिक कार्यकर्त्यांनी आईचे झाड ही संकल्पना राबवून वसईत ठिकठिकाणी वृक्षारोपण केले. वसईतील सामाजिक कार्यकर्ता मिलिंद चव्हाण यांच्या आई सुनंदा शिवराम चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृती जीवंत ठेवण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण मोहिमेतून पर्यावरणाचे संवर्धन होईल, या विचारातून उपक्रम सुरू केल्याचे आयोजक छोटू आनंद,उमेश शिखरे यांनी सांगितले. आईचे झाड हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मानसी तिवरेकर, संजीवनी चांदोरकर, मुतूझा मिठाईवाला, हरीश बिष्ट,समिधा चव्हाण, अमित मेहरोत्रा यांनी विशेष प्रयत्न केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number