रेल्वे ट्रॅकवरील साचलेल्या पाण्यातून तुफानी वेगाने ट्रेन नेणाऱ्या मोटरमनवर शिस्तभंगाची कारवाई

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नालासोपाऱ्यात ट्रॅकवर साचलेल्या गुडघाभर पाण्यातून भरधाव ट्रेन नेल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली.   ट्रॅकवर पाणी साचल्यानं वेग कमी ठेवण्याची माहिती एक्स्प्रेस ट्रेनच्या लोको पायलटला न दिल्याने विरार स्टेशन मास्तर बिपीनकुमार सिंह आणि पी वे विभागाचे अधिकारी शेख अब्दुल रहीमवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.   20 सप्टेंबर रोजी मुंबईत जोरदार […]

रेल्वे ट्रॅकवरील साचलेल्या पाण्यातून तुफानी वेगाने ट्रेन नेणाऱ्या मोटरमनवर शिस्तभंगाची कारवाई

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नालासोपाऱ्यात ट्रॅकवर साचलेल्या गुडघाभर पाण्यातून भरधाव ट्रेन नेल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली.

 

ट्रॅकवर पाणी साचल्यानं वेग कमी ठेवण्याची माहिती एक्स्प्रेस ट्रेनच्या लोको पायलटला न दिल्याने विरार स्टेशन मास्तर बिपीनकुमार सिंह आणि पी वे विभागाचे अधिकारी शेख अब्दुल रहीमवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

 

20 सप्टेंबर रोजी मुंबईत जोरदार पावसाने हजरे लावली होती. परिणामी, लोकलच्या अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचलं होतं. त्यापैकी नालासोपारा स्टेशनच्या ट्रॅकवर गुडघाभर पाणी साचलं होतं.

 

दुपारी साडेबाराच्या सुमारास प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी होती. त्याचवेळी गुडघाभर पाण्यातून लोको पायलटने भरधाव एक्स्प्रेस ट्रेन नेली. पण ज्यावेळी लोको पायलटने हा तुफानी कार्यक्रम केला, तेव्हा त्याने फलाटावरील लोकांना आंघोळ घातलीच परंतु ट्रेनमधील प्रवाशांचाही जीव धोक्यात घातला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number