बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या संशयीत तस्करीचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. यामध्ये मनमाड रेल्वे स्थानकावरून २९ अल्पवयीन मुलांची मनमाड रेल्वे पोलिसांनी सुटका केली आहे.
मनमाड रेल्वे स्थानकावरून सुटका केलेली ही मुलं बिहारहून मनमाड रेल्वे स्थानकात पोहोचली. मुलांना सांगली आणि पुण्यातील मदरशात नेलं जात असल्याची माहिती मिळाली आहे. मनमाड रेल्वे स्थानकावर या मुलांना उतरवण्यात आलं. त्यानंतर सध्या या मुलांना नाशिकला आणण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलांना बिहारमधून महाराष्ट्रात का आणण्यात येत होतं या संदर्भात पोलिसांची चौकशी सुरु आहे.