बिहार येथून ५९ मुलांना सांगली आणि पिंपरी चिंचवडच्या मदरशात घेऊन जाणाऱ्या मौलाना शिक्षकांना मनमाड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर त्यांची सोमवारी पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना मनमाड कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने चारही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली आहे. सद्दाम हुसेन, नोमन सिद्दीकी, मोहंमद शहानवाज आणि एजाज सिद्दीकी अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांवर मदरशात दाखल करण्यासाठी मुलांना घेऊन जाण्याच्या नावाखाली कथित तस्करी करत असल्याचा आरोप आहे. ३१ मे रोजी त्यांना अटक करण्यात आल्यानंतर कोर्टाने त्यांना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. चौघांना जामीन मिळावा यासाठी त्यांचे वकील मालेगावच्या जिल्हा सत्र न्यायलयात अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांचे वकील अॅडवोकेट नियाज अहेमद लोधी यांनी सांगितले.