ट्रकचालकांचा उद्दामपणा बेतला पोलिसांच्या जीवावर, दोघांना चिरडलं

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर ट्रकचालकांचा उद्दामपणा वाहतूक पोलिसांच्या जीवावर बेतल्याचं उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. अशा उद्दाम वाहनचालकांमुळे 2 वाहतूक पोलिसांना आपला जीव गमवावा लागलाय. सोलापुरात गजानन ननवरे आणि तर यवतमाळमध्ये करमोद्दीन सैय्यद यांचा मृत्यू झालाय. सोलापुरात आरोपी ट्रकचालकानं रिक्षाला धडक देऊन पळ काढला. ननवरेंनी या ट्रकला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रकचालकानं त्यांच्या अंगावरच थेट […]

ट्रकचालकांचा उद्दामपणा बेतला पोलिसांच्या जीवावर, दोघांना चिरडलं

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

ट्रकचालकांचा उद्दामपणा वाहतूक पोलिसांच्या जीवावर बेतल्याचं उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. अशा उद्दाम वाहनचालकांमुळे 2 वाहतूक पोलिसांना आपला जीव गमवावा लागलाय. सोलापुरात गजानन ननवरे आणि तर यवतमाळमध्ये करमोद्दीन सैय्यद यांचा मृत्यू झालाय. सोलापुरात आरोपी ट्रकचालकानं रिक्षाला धडक देऊन पळ काढला. ननवरेंनी या ट्रकला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रकचालकानं त्यांच्या अंगावरच थेट ट्रक घातला. ननवरे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तर यवतमाळमध्ये भरधाव ट्रकनं करमोद्दीन सैय्यद यांना चिरडलं. त्यांचा जागीच मृत्यू झाला. पांढरकवडा बायपास रोडवर ही घटना घडली. या दोन्ही उद्दाम ट्रकचालकांना पोलिसांनी जेरबंद केलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number