जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
वाहतूक पोलिसांशी बाचाबाची करताना किंवा हुज्जत घालताना यापुढे दहा वेळा विचार करा. कारण, की लवकरच मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांच्या छातीवर वायफाय
कॅमेरा लावण्यात येणार आहेत.
यंत्रणेत पारदर्शकता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नेहमीच्या वॉकी-टॉकी आणि लवाजमाशिवाय पोलिसांना आता हा वायफाय कॅमेराही सोबत बाळगावा
लागणार आहे.
या कॅमेऱ्यात रस्त्यावरील पोलिसाचं प्रत्येक वाहनचालकांसोबतचं संभाषण रेकॉर्ड केलं जाईल आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग होणार.
त्यामुळे एखादा व्यक्ती पोलिसांशी जे काही संभाषण किंवा अरेरावी करेल ती सगळी रेकॉर्ड होऊन कंट्रोल रुमला जाईल. कायदेशीर कारवाईसाठी पुरावा म्हणून रेकॉर्ड
केलेली माहिती ग्राह्य धरली जाणार आहे.