Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर बोरघाटात आज वाहतूक बंद; प्रवासाआधी जाणून घ्या ‘हे’ पर्यायी मार्ग

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील बोरघाट परिसरात आज 18 जून रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Mumbai Pune Expressway:  मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर बोरघाटात आज वाहतूक बंद; प्रवासाआधी जाणून घ्या ‘हे’ पर्यायी मार्ग

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील बोरघाटात आज वाहतूक बंद राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील बोरघाट परिसरात आज 18 जून रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत वाहतूक बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळकडून (MSRDC) रॉकफॉल प्रतिबंधक जाळीत अडकलेले दगड काढण्यासाठी हे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम तातडीचे असल्याने दुपारी 12 ते 2 या वेळेत द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या चालकांनी पर्यायी मार्गाचा किंवा वेळेचे नियोजन करूनच प्रवासाला सुरुवात करावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारची कोंडी किंवा गैरसोय होणार नाही.

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सुमारे 47 किमी अंतरावर काम केले जाणार असून सुरक्षेच्या कारणास्तव जड व अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अडचण आल्यास द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे. 

हेही वाचा- Nashik Water Cut : नाशिककरांनो पाणी जपून वापरा! 'या' तारखेपासून शहरात पाणीकपात लागू; ऑगस्टमध्ये दोन दिवसाआड पुरवठा बंद

अवजड वाहनांसाठी काही आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, बोरघाट मार्गे मुंबईकडे जाणारी 50 किमीपासून पुढील वाहतूक अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच पुण्याकडे जाणारी 30 किमीपासून पुढील वाहतूक देखील अवघड वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. 

तर दुसरीकडे हलकी वाहने, बसेस आणि प्रवासी वाहनांसाठी पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक 50 किमीपासून कनेक्टिंग लिंकमार्गे वळविण्यात येणार आहे. तर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक 32 किमीपासून कनेक्टिंग लिंकमार्गे वळविण्यात येणार आहे. बसेस, प्रवासी वाहने तसेच जड-अवजड वाहने द्रुतगती मार्गावरील किलोमीटर क्रमांक 45 येथे थांबविण्यात येतील. तसेच लोणावळा आणि खंडाळा परिसरातील वाहनचालकांनी वाहतूक बदल लक्षात घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number