Mumbai : ट्रॅफिकमुळे वरळीत, तर अंगारकीमुळे दादरला वाहतुकीत बदल; सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत ‘या’ मार्गावर सम-विषम पार्किंग

मुंबई : अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. मुंबईत वाहतूक विभागाने वरळी येथे डिसेंबरपर्यंत जी. एम. भोसले मार्ग, प्र. के. कुरणे चौक ते आचार्य अत्रे चौक मार्गावर सम-विषम पार्किंग सुरू केली आहे. तर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर […]

Mumbai : ट्रॅफिकमुळे वरळीत, तर अंगारकीमुळे दादरला वाहतुकीत बदल; सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत ‘या’ मार्गावर सम-विषम पार्किंग

मुंबई : अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. मुंबईत वाहतूक विभागाने वरळी येथे डिसेंबरपर्यंत जी. एम. भोसले मार्ग, प्र. के. कुरणे चौक ते आचार्य अत्रे चौक मार्गावर सम-विषम पार्किंग सुरू केली आहे. तर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर दादर येथे पाच ठिकाणी वाहतूक बदल करण्यात आले आहेत. बदल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू असणार आहेत. वरळी वाहतूक क्षेत्रातील जी. एम. भोसले हा मार्ग प्र. के. कुरणे चौक ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) पर्यंत जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक नियमन करण्यासाठी आणि अस्थायी पार्किंग नियंत्रण ठेवण्यासाठी 24 तास नो पार्किंग आणि तारखेनुसार सम-विषम पार्किंगबाबत तात्पुरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा वाहतूक बदल 20 सप्टेंबर रात्री 12 पासून ते 18 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत करण्यात आला आहे. जी. एस. भोसले मार्ग दक्षिण आणि उत्तर वाहिन्यावर सम-विषम पार्किंगनुसार असून हा तात्पुरता बदल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू असणार आहे.

हेही वाचा : Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भरधाव BMWचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू, एक गंभीर; समोर आलेल्या प्रकाराने सर्वच हादरले

भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतुकीवर पडतोय ताण 

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दादर वाहतूक विभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग एस. के. बोले रोड, गोखले रोड (दक्षिण) आणि काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी रोड (उत्तर) आणि आप्पासाहेब मराठे मार्ग या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे वाहतुकीवर ताण पडतो. वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी 21 सप्टेंबरला 6 ते रात्री 12 च्या दरम्यान वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

सिद्धिविनायक मंदिर परिसरात होते गर्दी

21 सप्टेंबर रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने श्री सिद्धिविनायक मंदिर आणि आसपासच्या परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या गर्दीचा प्रभाव वाहतुकीवर होऊन या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. याकरिता या परिसरातील मार्गांवर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पावले उचलली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number