वृत्तसंस्था, मुंबई अल्काटेलनं आपला टु-इन-वन टॅब लॉन्च केलाय. यात की-बोर्डदेखील देण्यात आलाय. यामुळे हे मॉडेल लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही स्वरूपात वापरता येणार आहे. तसेच, ब्ल्यु-टूथच्या मदतीनं हा कि-बोर्ड टॅबलेटला कनेक्ट करता येतो. तसेच OTG कनेक्टरच्या माध्यमातून माऊसदेखील वापरण्याची सुविधा यात देण्यात आलीय.