Satara Waterfalls : साताऱ्यातील धबधब्यांचा मनमोहक नजारा; निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी

सातारा : सह्याद्रीने हिरवा शालू नेसलाय… धुक्याची दुलई पांघरलीय… आणि फेसाळणाऱ्या धबधब्यांनी साताऱ्याचा निसर्ग पुन्हा एकदा बहरून आलाय. सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. विशेषतः जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या धबधब्यांवर तरुणाईची अक्षरशः तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. रिमझिम सरी, हिरव्यागार डोंगररांगा आणि दुधाळ पांढरे धबधबे पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक साताऱ्यात दाखल होत आहेत. शनिवार-रविवारी केळवली, […]

Satara Waterfalls : साताऱ्यातील धबधब्यांचा मनमोहक नजारा; निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी

सातारा : सह्याद्रीने हिरवा शालू नेसलाय… धुक्याची दुलई पांघरलीय… आणि फेसाळणाऱ्या धबधब्यांनी साताऱ्याचा निसर्ग पुन्हा एकदा बहरून आलाय. सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. विशेषतः जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या धबधब्यांवर तरुणाईची अक्षरशः तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. रिमझिम सरी, हिरव्यागार डोंगररांगा आणि दुधाळ पांढरे धबधबे पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक साताऱ्यात दाखल होत आहेत. शनिवार-रविवारी केळवली, भांबवली-वजराई, ठोसेघर, लिंगमळा, एकीव, ओझर्डेसह जिल्ह्यातील प्रमुख धबधबे पर्यटकांनी अक्षरशः हाऊसफुल झाले. 

हेही वाचा : Bhaskar Jadhav : ठाकरेंचे शिलेदार शेतात! भास्कर जाधवांनी गाणी गात केली भाताची लावणी; व्हिडीओ व्हायरल

सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील सह्याद्रीच्या डोंगर रांगातील निसर्ग अधिकच खुलून आला आहे. हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याची चादर आणि शुभ्र फेसाळत कोसळणारे धबधबे पर्यटकांना अक्षरशः खुणावत आहेत.शनिवार आणि रविवारी सकाळपासूनच सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा ओघ सुरू झाला. धबधब्याखाली भिजण्याचा आनंद, सेल्फी, व्हिडिओ शूट, रिल्स आणि मित्र-परिवारासोबत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येथे दाखल झाले. जाणून घेऊया सातारा जिल्ह्यातील प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेले धबधबे…

केळवली धबधबा

सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील केळवली धबधबा हा सध्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरला आहे. हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेला हा धबधबा, थंडगार वारा आणि निसर्गरम्य वातावरणामुळे प्रत्येक पर्यटकाला मोहून टाकत आहे.

भांबवली-वजराई धबधबा

सुमारे 840 फूट उंचीवरून कोसळणारा भांबवली-वजराई धबधबा हा भारतातील उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो. उंच कड्यावरून तीन टप्प्यात कोसळणाऱ्या या धबधब्याचे रौद्र आणि मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून भेट देत आहेत.

ठोसेघर धबधबा

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला ठोसेघर धबधबा आपल्या भव्य रूपामुळे पर्यटकांचे कायम आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात हा परिसर अधिकच नयनरम्य बनत असून, धुक्याने वेढलेले दृश्य प्रत्येकाला मंत्रमुग्ध करत आहे.

लिंगमळा धबधबा

महाबळेश्वरजवळील लिंगमळा धबधबा सुमारे पाचशे फूट उंचीवरून कोसळतो. धुक्याची चादर, थंडगार हवा आणि घनदाट जंगलामुळे हा परिसर देशभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे.

ओझर्डे नवजा धबधबा

सह्याद्रीच्या घनदाट जंगलात आणि कोयना अभयारण्याच्या कुशीत वसलेला ओझर्डे धबधबा हा ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी विशेष आकर्षण आहे. घनदाट जंगलातून वाहणारा हा धबधबा शांतता आणि निसर्गाचा अनोखा अनुभव देतो.

एकीव धबधबा

कास पठाराच्या जवळील एकीव गावाजवळ असलेला हा धबधबा हिरव्यागार डोंगर आणि त्यामधून फेसाळत येणारे पांढरे शुभ्र पाणी आतून-मधून धुक्याची चादर हे मनमोहक वातावरण अक्षरशः डोळ्याचे पारणे भेटत आहे. याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अक्षरशः मोठ्या संख्येत या ठिकाणी येऊ लागले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number