मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी : सध्या किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटोचे दर वाढले आहेत. एपीएमसीत होणारी आवक कमी होत आहे. सोमवारी घाऊक बाजारात दरवाढ झाली असून घाऊक बाजारात टोमॅटोची किंमत ७०-१०० रुपये तर किरकोळ बाजारात १००-१५० रुपयांवर गेली आहेत. देशभरात टोमॅटोच्या किंमतींनी १०० रुपयांचा टप्पा पार केला आहे. यंदा टोमॅटो उत्पादन कमी असल्याने पुढील कालावधीत टोमॅटोचे दर गगनाला भिडणार असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या काळात घाऊक बाजारातील टोमॅटोची किंमत १०० रुपयांच्या पुढे जाऊ शकते अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, टोमॅटोचा वाढलेला भाव पाहून आता चोरांची नजर टोमॅटोवर आहे. कर्नाटकात एका शेतातल्या तब्बल अडीच लाख रुपयांच्या टोमॅटोंची चोरी झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. शेतातूनच होतेय टोमॅटोची चोरीदेशभरात टोमॅटोच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना तूर्त दिलासा मिळणार नाहीये. कारण मान्सूनमुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचं पिक खराब झालयं. परिणामी भाव १६० रुपये प्रति किलोंच्या घरात गेले आहेत. असं असताना आता थेट शेतातूनच टोमॅटोची चोरी होऊ लागली आहे. कर्नाटकच्या बेलूरमध्ये चोरांनी शेतातून २.७ लाख रुपये मूल्याच्या टोमॅटोची चोरी केल्याची घटना समोर आलीये.
बेलूरच्या शेतकऱी म्हणाला, चोरांनी मंगळवारी रात्रीत टोमॅटो पळवले. आम्ही दोन एकरात टोमॅटोची शेती केली होती. मात्र आमच्या हाती काहीच लागलं नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणाच्या महबूबाबाद जिल्ह्यात एका दुकानातून २० किलो टोमॅटो चोरी झाले. दुकानदाराने एका बाँक्समध्ये ठेवलेले २० किलो टोमॅटो आणि अंदाजे ३५ किलोच्या चार इतर भाज्यांचे बाॅक्स अज्ञात चोरांनी चोरले. महानगरांमध्ये कोलकातामध्ये टोमॅटोच्या घाऊक किंमती १५२ रुपये प्रति किलो आहेत.त्यानंतर दिल्लीत १२० रुपये प्रति किलो दर आहेत. चेन्नईत ११७ रुपये प्रति किलो तर मुंबईत १०८ रुपये प्रति किलो दर आहेत. मान्सूनमुळे यंदा टोमॅटोच्या पिकांचं नुकसान झाल आहे.