दरवर्षी टोमॅटोला निव्वळ उत्पादन खर्च निघेल इतकाही बाजार भाव मिळत नाही मात्र या वेळी परिस्थिती बदलली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. अनेक शेतकरी हतबल झालेले असताना या वर्षीही शेतकऱ्यांनी कर्ज काढत टोमॅटोचे उत्पादन घेतले. या वेळी मात्र शेतकऱ्यांच्या कष्टाला यश आल्याचं बघायला मिळालं.
यावेळी शेतकऱ्यांच्या उपादान खर्चासह भरगोस नफाही मिळाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील धुळवड गावातील जवळपास ९०% शेतकरी टोमॅटोची शेती करत असून गेल्या दहा ते वीस वर्षापासून अनेक जण टोमॅटो पीक घेतात यावर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळाल्याने अनेक शेतकरी येथील लखपती तसेच काही करोडपती देखील झाले आहे. सुरुवातीला टोमॅटो निघण्यास सुरुवात झाली तर पन्नास रुपये कॅरेट भाव होता. त्यानंतर भाव वाढत गेला १२०० बाराशे ते २ हजार रुपये पर्यंत टोमॅटोच्या कॅरेटला भाव मिळू लागल्याने गेल्या वीस वर्षांमध्ये जो तोटा झाला होता तो भरून निघत आहे.