जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ग्राहकांना प्रतिकिलो 100 रुपयांनी मिळणाऱ्या टोमॅटोचे शेतकऱ्यांच्या हाती फक्त 20 ते 40 रुपये मिळत आहेत. टोमॅटो महाग झाला मात्र त्याचा फायदा नेमका कुणाला होत आहे. याचा पुण्याच्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत रिअॅलिटी चेक करण्यात आला.
त्यावेळी व्यापाऱ्यांना मिळणारा टोमॅटो आणि ग्राहकांना मिळणारा टोमॅटो यांच्या दरात कमालीची तफावत दिसून आली.
व्यापाऱ्यांकडे असलेला टोमॅटो 400 ते 800 रुपये क्रेट आहे. म्हणजे शेतकऱ्याला प्रतिकिलो 20 ते 40 रुपये दर मिळत आहे. तर हाच टोमॅटो ग्राहकांना मात्र 100 रुपये किलो दरानं विकला जात आहे.
त्यामुळे एकीकडे शेतकऱ्याची फसवणूक होते, तर दुसरीकडे ग्राहकाची लूट होते. तर प्रतिकिलो 40 ते 60 रुपये कुणाच्या खिशात जाताहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे.