जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यातील खारेगाव टोलनाका आज मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. भिवंडी बायपासवरील खारेगाव टोलनाका हा मुदत संपून बंद होणारा पहिला टोल नाका असणार आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्याची उभारणी आणि तिच्या देखभालीचा खर्च वसूल झाल्याने राज्यसरकारनं 13 मेच्या मध्यरात्रीपासून हा टोलनाका बंद करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार हा टोलनाका आता बंद होणार आहे. हा टोलनाका बंद होणार असल्यानं या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे पैसे आता वाचणार आहेत.
तसंच टोलनाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही प्रवाशांची मुक्तता होणार आहे. टोलनाका बंद होणार असल्यानं वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला आहे.