दीपक पुनियाचा टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाच्या सामन्यातही पराभव

८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिसकडून पराभूत झालेल्या दीपक पुनियाचा टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाच्या सामन्यातही पराभव झालाय. मायलीस अ‍ॅमिनेला त्याने त्याला ३-२ ने पराभूत केलं आहे. विशेष म्हणजे शेवटच्या १० सेकंदामध्ये दीपक पुनियाचा पराभव झाला. पहिल्या तीन मिनिटांनंतर स्कोअरकार्ड २-१ असं होतं. मात्र सामन्यातील शेवटच्या तीन मिनिटांमध्ये दीपकने आक्रमक पद्धतीने खेळून गुण मिळवण्याऐवजी […]

दीपक पुनियाचा टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाच्या सामन्यातही पराभव

८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिसकडून पराभूत झालेल्या दीपक पुनियाचा टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाच्या सामन्यातही पराभव झालाय. मायलीस अ‍ॅमिनेला त्याने त्याला ३-२ ने पराभूत केलं आहे. विशेष म्हणजे शेवटच्या १० सेकंदामध्ये दीपक पुनियाचा पराभव झाला.

पहिल्या तीन मिनिटांनंतर स्कोअरकार्ड २-१ असं होतं. मात्र सामन्यातील शेवटच्या तीन मिनिटांमध्ये दीपकने आक्रमक पद्धतीने खेळून गुण मिळवण्याऐवजी बचावात्मक पवित्रा स्वीकारला आणि तिथेच त्याला फटका बसला. सामन्यातील अगदी २० सेकंद उरलेलं असताना मायलीसने त्याचा पाय पकडला आणि १० सेकंदांहून कमी वेळ शिल्लक असताना मायलीसने पुनियाविरोधात दोन गुण पटकावले. त्यामुळेच आधीचा एक गुण आणि हे दोन गुण असे एकूण ३ गुण मिळाल्याने मायलीस विजेता ठरला. सामन्याच्या शेवटच्या सेकंदामध्ये मिळालेल्या या गुणांसंदर्भात पुनियाने चॅलेंज केलं. मात्र सर्व पंचांनी पुन्हा एकदा व्हिडीओ पाहून आपला दोन गुण देण्याचा निर्णय कायम ठेवला.

मायलीस हा सॅन मॅरिनो या छोट्याश्या देशाचं प्रतिनिधित्व करतो. सॅन मॅरिनोचं हे ऑलिम्पिकमधील तिसरं पदक ठरलं. हा युरोपमधील सर्वात छोट्या देशांपैकी एक आहे. हा देश पूर्णपणे इटलीने वेढलेला आहे. या देशाचे क्षेत्रफळ ६१.२ स्वेअर किलोमीटर इतके आहे. या देशाची लोकसंख्या अवघी ३३ हजार ६०० इतकी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number