गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या किमतींमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या खपात मोठी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील घडामोडी आणि ट्रम्प प्रशासनाच्या नव्या मवाळ भूमिकेमुळे बुलियन मार्केटमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. युद्धविरामाची चर्चा प्रत्यक्षात आल्यास अर्थव्यवस्थेला आणि जागतिक व्यापाराला स्थैर्य मिळेल, या आशेवर गुंतवणूकदार मोठी खरेदी करत आहेत.
अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे जळगावच्या बाजारात सोने-चांदीचे दर घसरले आहेत. गेल्या 24 तासात सोन्याच्या दर मोठी घसरण झाली असून चांदीचे दरही घसरले आहेत. अमेरिका इराण युद्ध विराम होणार होते मात्र इराणने युद्ध कायम ठेवल्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीवर सोन्यात पुन्हा घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जळगावच्या बाजारात सोन्याचे दर आज 2500 रुपयांनी कमी झाले असून चांदीचे दर हे 5 हजार रुपयांनी घसरले आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 47 हजार रुपये जाऊन पोहोचले आहे. तर चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 42 हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.
दरम्यान आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,32,532 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,44,580 प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,532 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,580 रुपये आहे. नागपूरात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,532 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा 1,44,580 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,532 रुपये आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,580 रुपये आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाला व गुंतवणूकदार कच्च्या तेलाकडे वळल्यामुळे सातत्याने सोने-चांदीचे दर हे घसरत आहे . अमेरिका इराण युद्ध थांबले तर पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता आहे.