जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यभरात पाऊस पडण्याची शक्यता अजुनही कायम आहे असा अंदाज हवामान खात्यान वर्तवला आहे. आजही राज्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज आहे. येत्या १३ फेब्रुवारी पर्यंत पावसाचं वातावरण कायम राहील अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामधे मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. बाकी उर्वरीत राज्यात हवामान कोरडं राहील असं हवामान खात्याकडून सांगण्यात येतंय.
या परिस्थितीत जर पिकांची काढणी केली असल्यास पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. उन्हाळी पिकांची लागवड केली नसल्यास ती तत्वरीत पूर्ण करावी. वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांचं रोज निरिक्षण करावं, पिकांकडे लक्ष असूद्यात. रोग अथवा किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास त्वरीत उपाय-योजना कराव्यात. आंबा आणि इतर फळांची आणि पिकांची विशेष काळजी घ्यावी असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला गेला आहे.