Gold-Silver Price : सोनं गाठणार 3 लाखांचा आकडा टप्पा? तज्ज्ञांनी व्यक्त केली मोठी चिंता

आज म्हणजेच 22 डिसेंबर रोजी सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठलेला असून सोन्याचे दर 1805 रुपये आणि चांदीच्या दरात 7214 रुपयांची वाढ झाली आहे.

Gold-Silver Price : सोनं गाठणार 3 लाखांचा आकडा टप्पा? तज्ज्ञांनी व्यक्त केली मोठी चिंता

सोने गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. या आठवड्यात भारतातील सोन्याचे दर त्यांच्या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. अशातच देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात उलटफेर झाले आहेत. आज म्हणजेच 22 डिसेंबर रोजी सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठलेला असून सोन्याचे दर 1805 रुपये आणि चांदीच्या दरात 7214 रुपयांची वाढ झाली आहे.

हेही वाचा- China Gold Deposit: निसर्गाची किमया की तंत्रज्ञानाचा करिश्मा? चीनला समुद्राखाली सापडलं सोन्याचं 'बेट'!

आजचे सोन्याचे दर पाहायचे झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्क येथील कॉमेक्सवर 4400 डॉलर प्रति औंस इतका आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 4410 डॉलर प्रति औंस आहे. यावेळी 24 कॅरेट सोन्याचा दर 137591 रुपये प्रति तोळा, 23 कॅरेट सोन्याचा दर 1798 रुपयांनी वाढून 133049 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला असून 22 कॅरेट सोन्याचा दर  1653 रुपयांनी वाढून 122363 रुपयांवर पोहोचला आहे.

हेही वाचा- RBI Repo Rate: रेपो रेट घटला, पण बँक हफ्ता जैसे थे! आरबीआयच्या पतधोरणामागचे 'हे' गुपित तुम्हाला माहित आहे का?

त्याचसोबत एक किलो चांदीचा दर 213776  रुपये झाला आहे. एमसीएक्सवरील भारतीय बाजारानूसार सोन्याचा दर 135890 रुपये आहे. 2025 मध्ये सोन्याचा दर 57884 रुपयांनी वाढले आहेत, तर चांदीचे दर  121533 रुपयांनी वाढले आहेत. त्याचसोबत सोन्याचे दर या दशकाच्या शेवटपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढू शकतील असा अंदाज यार्डेनी यांनी वर्तवला आहे. तर 2029 पर्यंत यात 127 टक्क्यांची तेजी आल्यास सोन्याचे दर 3.08 लाख रुपये इतका वाढू शकतो. अमेरिकन शेअर बाजारातून एस अँड पी 500 निर्देशांक 7700  पर्यंत पोहोचू शकतो, असा सकारात्मक अंदाज यार्डेनी यांनी वर्तवला आहे.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number