रोहित पवार यांचा पार्थला सल्ला…

‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी राजकीय वाटचालीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांना सल्ला दिला आहे. राजकारणात यशस्वी होण्यासाठी जास्तीत वेळ लोकांमध्ये राहा, असा असा सल्ला रोहित पवारांनी पार्थ यांना दिला आहे. पवार कुटुंबाच्या राजकारणावर भाष्य करताना रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली. निवडणूक लढताना कुटुंबाच्या कामाचा […]

रोहित पवार यांचा पार्थला सल्ला…

‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी राजकीय वाटचालीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांना सल्ला दिला आहे. राजकारणात यशस्वी होण्यासाठी जास्तीत वेळ लोकांमध्ये राहा, असा असा सल्ला रोहित पवारांनी पार्थ यांना दिला आहे.

पवार कुटुंबाच्या राजकारणावर भाष्य करताना रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली. निवडणूक लढताना कुटुंबाच्या कामाचा फायदा झाला असून माझ्या कुटुंबामुळे माझे राजकीय अस्तित्व असल्याचे रोहित पवार म्हणाले. यावेळी रोहित पवारांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना सल्ला दिला. रोहित पवार यांनी यशस्वी होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लोकांमध्ये राहण्याचा सल्ला पार्थ पवार यांना दिला. तसेच, प्रत्येकाची राजकारणाची पद्धत वेगवेगळी असते. माझी पद्धत पार्थपेक्षा वेगळी असल्याचेही रोहित पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number