जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
ठाण्यात पुन्हा एकदा परप्रांतियांच्या भरतीचा मुद्दा गाजला. यावेळी सत्ताधारी शिवसेनेनं याविरोधात आवाज उठवला. पालिकेच्या 327 आरक्षक पदाची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं पार पडली. पण यात ठाण्याची फक्त दोनच मुलं यशस्वी झाली.
तर अन्य उमेदवार हे बाहरेचे असल्याचं स्पष्ट झालं. यावरुन शिवसेनेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आवाज उठवला. भरती प्रक्रियेत घोटाळा झाला असून अधिकाऱ्यांनी आपापल्या भागातल्या मुलांना प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिकांना 50 टक्के प्राधान्य द्यावं अशी मागणी त्यांनी केली.