वैष्णवी हलवणे, गौरी गर्जे, दीप्ती मगर-चौधरी आणि पायल रणदिवे या प्रकरणातल्या जखमा ताज्या असतानाच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यात विवाहितेने इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात ही घटना घडली असून गंगा तेजस बेंबळकर असं नवविवाहितेचं नाव आहे. गंगा तेजस बेंबळकर या 27 वर्षाच्या होत्या.
तिच्या पतीचे नाव तेजस शिवा बेंबळकर असे आहे. नवविवाहित महिलेचा पती तेजस शिवा बेंबळकर याने अमेरिकेतून उच्चशिक्षिण घेतले आहे. तेजस आणि गंगा यांचा विवाह 3 महिन्यांपूर्वी झाला. मात्र लग्नानंतर गंगाला सासरच्या मंडळींकडून छळाला समोर जावं लागलं. मृत्यू पावलेल्या महिलेचा नवरा, सासू, नणंद आणि सासरे यांच्या विरोधात पुण्यातील बाणेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे. दरम्यान या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे.