प्रशासनावर रस्ते धुण्याची वेळ

अनेक ठिकाणी पावसाळा सुरु झाल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनांचे अपघात होतात. त्यातच नाशिकमध्ये मात्र रस्त्यांवर खड्डे नसतानाही अपघातांचे प्रमाण वाढले  आहे, नाशिक हद्दीत असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात. त्यामुळे नाशिकमधील रस्ते धुण्याची वेळ महापालिका प्रशासन आणि न्हाई ( NHAI ) वर आली आहे. नाशिक हद्दीत असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली गेल्या अनेक […]

प्रशासनावर रस्ते धुण्याची वेळ

अनेक ठिकाणी पावसाळा सुरु झाल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनांचे अपघात होतात. त्यातच नाशिकमध्ये मात्र रस्त्यांवर खड्डे नसतानाही अपघातांचे प्रमाण वाढले  आहे, नाशिक हद्दीत असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात.

त्यामुळे नाशिकमधील रस्ते धुण्याची वेळ महापालिका प्रशासन आणि न्हाई ( NHAI ) वर आली आहे. नाशिक हद्दीत असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात आणि त्यामुळे होणारे अपघात चिंतेचा विषय बनतो आहे.

यावर उपाय म्हणून जेसीबीच्या सहाय्याने रस्ते साफ करण्यात आले. त्याचाही काही फायदा झाला नाही म्हणून उड्डाणपुलाखाली असलेल्या दुभाजकाची उंची वाढवण्यात आली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याचाही कुठलाही उपयोग झाला नाही आणि यंदाच्या वर्षीही रस्ते निसरडे होऊन अपघात होऊ लागले. त्यामुळे प्रशासनावर थेट रस्ते धुण्याची वेळ आली आहे. अग्निशमन बंबाच्या सहाय्याने गुरुवारी रात्रीच्या वेळेला रस्ते धुण्याचे काम सुरू करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number