वृत्तसंस्था, मुंबई
वर्षाअखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यात संजय लीला भंसालीच्या “पद्मावती”सह सलमान खानचा “टाइगर ज़िंदा है” हा चित्रपट रिलीज होणार आहे.
या दोन्ही चित्रपटांच्या रिलीजमध्ये बरेच अंतर असले तरी, वर-चढ आतापासूनच सुरु झाली आहे.
सलमानच्या “टाइगर ज़िंदा है” चा ट्रेलर 24 तासांत तीन करोड लोकांनी पाहिला. तर, सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक आणि यू ट्यूबवर “टाइगर ज़िंदा है” च्या ट्रेलरला 29 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.
तर, “पद्मावती” च्या ट्रेलरला 24 तासांत 15 मिलियन व्ह्यूज आले आहेत. मंगळवारी रिलीज़ झालेल्या या ट्रेलरला एका तासात पाच लाख लोकांनी पाहिले.
“टाइगर ज़िंदा है” हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या “एक था टाइगर”चा रिमेक आहे. या चित्रपटात जबरदस्त एक्शन, स्टंट आणि काही रोमांटिक सीन्स आहेत. कटरीना या चित्रपटात एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे.
हा चित्रपट 22 डिसेंबरला रिलीज़ होणार आहे. याच्या आधी एक डिसेंबरला दीपिका पादुकोण -रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांचा “पद्मावती” चित्रपट रिलीज होणार आहे.