जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
जंगलाचा राजा असलेल्या वाघालाच आता संरक्षणाची गरज निर्माण झालीय. ज्या वाघाच्या एका डरकाळीनं भल्याभल्यांना घाम फुटतो तोच वाघ आता सुरक्षित नसल्याचं चित्र समोर येतयं. वाघांच्या मृत्यूचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीय. वाघ मृत्यूची जणू एक मालिकाच सुरू झालीय. राज्यात 2 दिवसांत 7 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
वर्षभरात महाराष्ट्राने 27 वाघ गमावलेत. यामध्ये वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरतोय. एकीकडे राज्य शासन वाघ वाचवा मोहिमेचा गाजावाजा करताना दिसतायत, तर दुसरीकडे वाघांच्या मृत्युचे सत्र थांबताना दिसत नाहीये. या मृत्यूची कारणं वेगवेगळी असली तरी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणाही तेवढाच कारणीभूत आहे.
वाघांची सुरक्षा आणि संवर्धन वन विभागाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी वन विभाग किती पार पाडते, कधी थांबणार वाघांच्या मृत्यूचे सत्र याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.