Maharashtra Weather Report : या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, पुढील दोन दिवस सतर्कतेचे; हवामान विभागाचा अलर्ट जारी

एकीकडे राज्यात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र झळा सोसाव्या लागत असून काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचे वातावरण झाले आहे.

Maharashtra Weather Report : या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, पुढील दोन दिवस सतर्कतेचे; हवामान विभागाचा अलर्ट जारी

मुंबई : एकीकडे राज्यात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र झळा सोसाव्या लागत असून काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचे वातावरण झाले आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. या दरम्यान, ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

हेही वाचा : Nashik Crime: गरोदर असताना पोटात लाथ मारली, तीन कोटींची खंडणी…; नाशिकमध्ये महिला लोकप्रतिनिधीवर पतीकडूनच अत्याचार

महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची नोंद होत असून यामुळे नागरिकांना तीव्र उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळला आहे. बुधवारी नागपूर आणि सातारा येथे पावसाची नोंद झाली असून हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या प्रदेशातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर याच प्रदेशातील अनेक भागात उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती असून येथे कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदली जात आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड आदी भागांना शुक्रवारी पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग आणि बीड आदी जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number