प्रवीण तरडेंनी सांगितला थरारक अनुभव

मुंबई, 2 मे २०२३, प्रतिनिधी : पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव पत्कारून परक्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागली. याच भयानक वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे अंगावर शहारा आणणारे ट्रेलर प्रदर्शित झाले.या चित्रपटात प्रवीण तरडे आणि स्मिता गोंदकर हे मुख्य भूमिकेत दिसणार असून प्रवीण तरडे हे वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळतायत.प्रवीण […]

प्रवीण तरडेंनी सांगितला थरारक अनुभव

मुंबई, 2 मे २०२३, प्रतिनिधी : पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव पत्कारून परक्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागली. याच भयानक वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे अंगावर शहारा आणणारे ट्रेलर प्रदर्शित झाले.या चित्रपटात प्रवीण तरडे आणि स्मिता गोंदकर हे मुख्य भूमिकेत दिसणार असून प्रवीण तरडे हे वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळतायत.प्रवीण तरडे यांनी नुकतेच त्यांच्या चित्रपटातील काही फोटोज फेसबुक या समाज माध्यमांवर सामायिक केले आहेत.

प्रवीण तरडे हे गावरान पद्धतीत वाळवंटाच्या प्रदेशात दिसून येतायत त्याच सोबत आजूबाजूला बरेच उंटही पाहायला मिळतायत. महत्वाचं म्हणजे बलोच या सिनेमाचं चित्रीकरण जैसलमेरच्या रखरखीत उन्हात ५०डिग्री तापमानात झाले.दिवस ५० डिग्री तर रात्री ९ ते १० डिग्री या वातवरणात सिनेमाच्या संपूर्ण टीमने काम केलं.या दरम्यानचा थरारक अनुभव प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत सांगितला.५० डिग्री च्या रखरखत्या उन्हात आमच्या सगळ्यांची तब्येत खराब झाली होती.आम्हाला भीती वाटत होती की,चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी कोणी आजारी पडलं तर कसं होईल पण सुदैवाने कोणीही आजारी पडलं नाही. भारत – पाकिस्तान बॉर्डरवर या सिनेमाचे चित्रीकरण होत असताना कलाकारांना अनेक चांगल्या वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले.

चित्रपटात नैसर्गिकतेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. मेकअप, पोशाख ते अगदी चित्रीकरण स्थळापर्यंत सगळ्याच गोष्टी नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अभिनेते प्रविण तरडेंनी सिनेमासाठी किती मेहनत घेतली हे ट्रेलरवरुन लक्षात येतं.बलोच’मध्ये प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर, अमोल कागणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ५ मे रोजी ‘बलोच’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या वितरणाचे काम फिल्मास्त्र स्टुडिओजच्या अमेय खोपकर, अमोल कागणे आणि प्रणित वायकर यांनी पाहिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number