राहुलना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाला धमकी

तामिळनाडूचे काँग्रेस नेते मणिकंदन यांनी सुरत कोर्टाच्या न्यायाधीशाची जीभ छाटण्याची धमकी दिली आहे. डिंडीगुल जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, ‘तामिळनाडूत सत्तेत आल्यानंतर आम्ही राहुल गांधींविरोधात निर्णय देणाऱ्या न्यायाधीशाची जीभ छाटू’ मणिकंदन यांनी गत 6 एप्रिल रोजी पक्षाने आयोजित केलेल्या निदर्शनांत ही धमकी दिली. सुरत न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना […]

राहुलना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाला धमकी

तामिळनाडूचे काँग्रेस नेते मणिकंदन यांनी सुरत कोर्टाच्या न्यायाधीशाची जीभ छाटण्याची धमकी दिली आहे. डिंडीगुल जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, ‘तामिळनाडूत सत्तेत आल्यानंतर आम्ही राहुल गांधींविरोधात निर्णय देणाऱ्या न्यायाधीशाची जीभ छाटू’ मणिकंदन यांनी गत 6 एप्रिल रोजी पक्षाने आयोजित केलेल्या निदर्शनांत ही धमकी दिली.

सुरत न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर राहुल यांची खासदारकी गेली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मणिकंदन यांच्याविरोधात भादंवि कलम 153B सह अन्य 2 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

मणिकंदन काय म्हणाले…

मणिकंदन म्हणाले, ‘न्यायाधीश कुणावर कारवाई करत आहेत? ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले… आमचे नेते राहुल गांधी व काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनामुळे आज जज मुक्तपणे आपले निर्णय देत आहेत.’ मणिकंदन यांनी यावेळी भाजपला देशातून मुळासकट उखडून फेकण्याचीही वल्गना केली. ते म्हणाले,‘तुम्हाला लोक शांत आहेत असे वाटत असेल. पण ते निरिक्षण करत आहेत. लोक एकत्र येत आहेत. ते लवकरच भाजपला मुळासकट उखडून देशाबाहेर फेकून देतील.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number