महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठी बातमी आली आहे. काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. बाळासाहेब थोरात यांच्यावर पक्ष कारवाई करू शकते, अशी चर्चा सुरू होत असताना त्यांनी राजीनाम्याचं शस्त्र उपसलं आहे. या राजकीय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून झालेला गोंधळ आणि त्यानंतर होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून वाद शिगेला गेला आहे. काँग्रेसमधील काही नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वावर नाराज असून, बाळासाहेब थोरातांनी थेट काँग्रेस नेतृत्वाकडे तक्रार केलीये. दरम्यान, बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.
सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपानंतर बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीला पत्र लिहिलं होतं. बाळासाहेब थोरातांनी या पत्रात नाना पटोले यांच्या नेतृत्वाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आता बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती असून, यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप झाला आहे. काँग्रेसनेतृत्वाला लिहिलेल्या पत्रातच बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.
थोरातांच्या राजीनाम्याबद्दल विचारल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “मी बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपण असं झालं, तसं झालं सांगत आहात, पण असं काहीही झालेलं नाही. आमच्याकडे त्यांचा कोणताही राजीनामा आलेला नाही