‘असा’ होता पंतप्रधानांचा नियोजित पंजाब दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बठिंडा येथे दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जाऊन अभिवादन करणार होते. तिथे त्यांचे हेलिकॉप्टरने जाण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र परिसरात पाऊस असल्याने पेच निर्माण झाला. यावेळी पंतप्रधानांनी साधारण वीस मिनिटे प्रतीक्षा केली. त्यानंतर त्यांनी रस्तेमार्गाने हुसैनीवाला येथे जाण्याचा निर्णय घेतला. रस्तेमार्गाने जाण्यासाठी हे अंतर साधारण […]

‘असा’ होता पंतप्रधानांचा नियोजित पंजाब दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बठिंडा येथे दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जाऊन अभिवादन करणार होते. तिथे त्यांचे हेलिकॉप्टरने जाण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र परिसरात पाऊस असल्याने पेच निर्माण झाला. यावेळी पंतप्रधानांनी साधारण वीस मिनिटे प्रतीक्षा केली. त्यानंतर त्यांनी रस्तेमार्गाने हुसैनीवाला येथे जाण्याचा निर्णय घेतला.

रस्तेमार्गाने जाण्यासाठी हे अंतर साधारण दोन तासांचे आहे. त्यामुळे दरम्यान या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत पंजाब पोलीस महासंचालकांना तैनात करण्यात आले. पंतप्रधान हे हुसैनीवाला येथे जाण्यास निघाल्यानंतर शहीद स्मारकाच्या सुमारे ३० किलोमीटर अलीकडे पंतप्रधानांचा ताफा थांबवावा लागला. त्यामुळे पंतप्रधानांना १५ ते २० मिनिटे वाटेतच थांबावे लागले. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेत अक्षम्य चूक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही निदर्शकांनी पंतप्रधानांचा वाहनताफा रोखल्याचे आढळून आले. राष्ट्रपती आणि पंतप्रधान ज्या रस्त्याने जातात तो रस्ता पूर्ण खाली केला जातो, पण इथे हे आंदोलक आले कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील अक्षम्य चूक लक्षात घेत तिथून बठिंडा येथे परतण्याचा निर्णय घेण्यात आला, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने नमूद केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number