संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. कर्नाटकमधील मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतदान केल्याने आता पक्षाला स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करता येणार आहे. या विजयाचे श्रेय जनतेला देत राहुल गांधींनी सेवांचे आभार मानले आहेत.
या निवडणुकीत मतमोजणीतील आघाडीनुसार, एकूण २२४ जागांपैकी काँग्रेस १३६ जागा तर, भाजपला ६४ जागांवर विजय मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये किंगमेकर राहण्याची शक्यता वर्तवलेला जनता दल सेक्युलरने २० जागांवर विजय मिळवला आहे.तर, इतर ४, राष्ट्रवादीला ३ आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला ० असा एकूण निकाल लागला आहे. निवडणुकीतील या विजयानंतर देशभरात काँग्रेसने जल्लोष साजरा केला. ‘हा विजय जनतेचा असून कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला’ असे म्हणत राहुल गांधींनी जनतेचे आभार मानले आहेत.