मुंबई , २७एप्रिल २०२३, प्रतिनिधी :मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी निवेदिता सराफ या एक आहेत. मालिका, सिनेमा आणि नाटक या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. सध्या त्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत रत्नमाला यभूमिकेत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. सध्या त्यांच्या ‘मी स्वरा आणि ते दोघं’ या नाटकाची देखील जोरदार चर्चा आहे.सध्या मी स्वरा आणि ते दोघे या नाटकात काम करत आहेत. यात नाटकाला चक्क जॉनी लिवर यांनी हजेरी लावली होती.
त्यामुळे त्यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत निवेदिता यांनी फॅन मूव्हमेंट असल्याचं सांगितलं. सोबतच त्यांचा अनुभवही शेअर केला.निवेदिता सराफ यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी प्रसिद्ध अभिनेते जॉनी लिवर यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी फोटो शेअर करत म्हटलं आहे की,’माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण होता. माझा आवडता अभिनेता आणि एक उत्तम व्यक्ती असलेले जॉनी लिवर ‘मी स्वरा आणि ते दोघं’ हे नाटक पाहायला आले.
ही माझ्यासाठी एक फॅन मूव्हमेंट होती. त्यांनी या नाटकाचे आणि माझ्या अभिनयाचे कौतुक केले. मी तुमची खूप आभारी आहे, जॉनी भाई,’ .. असं लिहित त्यांनी त्यांच्या सोबतचा फोटो समाज माध्यमावर सामायिक केला आहे.सध्या निवेदिता सराफ यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.दरम्यान,’मी स्वरा आणि ते दोघे’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजताना दिसत आहे. या नाटकात निवेदिता यांच्याबरोबर सुयश टिळक, रश्मी अनपट हे कलाकारही झळकत आहेत.