ही परिवर्तनाची नांदी – देवेंद्र फडणवीस

विधानपरिषदन निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा चमत्कार पाहायला मिळाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, भाजपाच्या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यसभेत १२३ मतं आणि आता विधान परिषद निवडणुकीत १३४ मतं घेतली असून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे ही […]

ही परिवर्तनाची नांदी – देवेंद्र फडणवीस

विधानपरिषदन निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा चमत्कार पाहायला मिळाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, भाजपाच्या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यसभेत १२३ मतं आणि आता विधान परिषद निवडणुकीत १३४ मतं घेतली असून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे ही परिवर्तनाची नांदी असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. असंतोष मतांमध्ये परावर्ति झाला असल्याचेही फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मविआची घसरण पहिल्या दिवसापासूनच सुरू झाली असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आमचा संघर्ष सत्तेसाठी नसून जनतेसाठी असल्याचेही फडणवीस म्हणाले.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड विजयी झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी झाले आहेत. तसेच काँग्रेसचा एक उमेदवार भाई जगताप विजयी झाले आहेत. मात्र, काँग्रेसचा दुसरे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे.

कोणत्या उमेदवाराला किती मत?

भाजप उमेदवार

  • प्रवीण दरेकर २९
  • श्रीकांत भारतीय ३०
  • राम शिंदे ३०
  • उमा खापरे २७
  • प्रसाद लाड २८

शिवसेनेचे उमेदवार

  • सचिन अहिर २६
  • आमशा पडवी २६

राष्ट्रवादीचे उमेदवार

  • एकनाथ खडसे २९
  • रामराजे निंबाळकर २८

काँग्रेसचे उमेदवार

  • भाई जगताप २६

काँग्रेसचे उर्वरित एक उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना २२ मतं मिळाली असून विधानपरिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number