‘हे सरकार शेतकऱ्यांचं’

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालत आंदोलन केले. यावर सरकारनी आपली भूमिका मांडली आहे. मंगळवारी, २८ फेब्रुवारी, २०२३ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा दराच्या प्रश्नावर बोलताना, ‘हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. ‘सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी आहे’, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या […]

‘हे सरकार शेतकऱ्यांचं’

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालत आंदोलन केले. यावर सरकारनी आपली भूमिका मांडली आहे.

मंगळवारी, २८ फेब्रुवारी, २०२३ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा दराच्या प्रश्नावर बोलताना, ‘हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. ‘सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी आहे’, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘कांदा दराच्या प्रश्नावर तोडगा काढावा, कांदाप्रश्नी आजच चर्चा करावी, असे आवाहन केले होते. तसेच, ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा विश्वास द्यावा’ ‘सरकारने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा’, असेही ते यावेळी म्हटले होते.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालत आंदोलन केले होते. सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत करावी तसेच कांद्याची खरेदी तातडीने सुरू करावी, या मागण्या विरोधी पक्षाकडून करण्यात आल्या होत्या.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number