‘ही दोस्ती तुटायची नाय’

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतात. तायतच शिवसेना-भाजपा यांच्या कार्यकर्त्यांच्या फलकबाजीतून वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबाबत विविध प्रकारे वक्तव्य होत होती. शिवसेनेच्या जाहिरातीनंतर भाजपाच्या गोटात नाराजीचे वातावरण होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र […]

‘ही दोस्ती तुटायची नाय’
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतात. तायतच शिवसेना-भाजपा यांच्या कार्यकर्त्यांच्या फलकबाजीतून वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबाबत विविध प्रकारे वक्तव्य होत होती.
शिवसेनेच्या जाहिरातीनंतर भाजपाच्या गोटात नाराजीचे वातावरण होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच कार्यक्रमात उपस्थित आहेत. दोघेही एकाच हेलिकॉप्टरने पालघर येथे कार्यक्रमाला गेले. यावेळीआताचे शासन बदलले आहे. सरकारी कार्यालयात आता खेटे मारायला लागत नाहीत. आपल्या योजना थेट लोकांपर्यंत पोहचल्या पाहीजेत, असा आमचा उपक्रम आहे. मी आणि उपमुख्यमंत्री आधीच्या सरकारमध्ये देखील होतो. आता ३५ लाख लाभार्थ्यांपर्यंत सरकार पोहचले आहे. आमचे सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये फरक आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.  डबल इंजिन सरकार येण्यापूर्वी सर्व कामांना ब्रेक लागले होते, आता सरकारने ४०० चांगले निर्णय घेतले, असे शिंदे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने फडणवीस काळातील अनेक योजना बंद केल्या. देवेंद्रजी पाच वर्षे मुख्यमंत्री होते. आता आपल सरकार आल्यानंतर योजना पून्हा सुरू केल्या. देवेंद्रजींच्या अनुभवाचा फायदा राज्याला झाला.  आमची युती सत्तेसाठी झाली नाही. एका वैचारिक भूमिकेतून ही युती झाली. मिठाचा खळा आम्ही बाजूला केला. फडणवीस आणि माझी दोस्ती १५ वर्षापासून आहे. जिवाभावाची आमची मैत्री आहे. हे बॉन्डिंग तुटणार नाही. फेविकॉल लावलेली आमची जोडी आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number