छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ‘बीआरएस’ची भव्य सभा होणार आहे. भारतीय राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्यासाठी केसीआर यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे. तर याची सुरुवात महाराष्ट्रातून आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातून करण्यात येत आहे. आगामी काळात मराठवाड्यात ‘बीआरएस’च विस्तार वाढवण्यासाठी मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. शहरातील बीड बायपास रोडवरील जाबिंदा मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आला आहे. संध्याकाळी 6 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे. तर सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून, सभेच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर होर्डिंग लावण्यात आले आहे.
माजी आमदार अण्णासाहेब माने, राष्ट्रवादीचे नेते संतोष माने, राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी, फेरोज पटेल, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. तर आणखी 40 माजी नगरसेवक यांच्यासह माजी आमदार, खासदार बीआरएस पक्षात आज दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
‘अबकी बार किसान सरकार’ या टॅगलाईन खाली ‘बीआरएस’कडून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात या पक्षाला मराठवाड्यात कितपत यश मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.