पैसे मागण्याच्या बहाण्याने ‘हा’ तृतीयपंथी थेट घरात घुसला आणि…

एका तृतीयपंथीयाने घरात शिरून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार चारकोप परिसरात घडला आहे. या तृतीयपंथीयाचं नाव एकनाथ शिंदे असून ‘पोक्सो’ अंतर्गत त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तृतीयपंथीयाला अटक केलं आहे. ही व्यक्ती नक्की तृतीयपंथी आहे का असा सवाल करण्यात येतोय.    नेमकं काय घडलं? चारकोप येथील आनंदीबाई केणी या चाळीत […]

पैसे मागण्याच्या बहाण्याने ‘हा’ तृतीयपंथी थेट घरात घुसला आणि…

एका तृतीयपंथीयाने घरात शिरून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार चारकोप परिसरात घडला आहे. या तृतीयपंथीयाचं नाव एकनाथ शिंदे असून ‘पोक्सो’ अंतर्गत त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तृतीयपंथीयाला अटक केलं आहे. ही व्यक्ती नक्की तृतीयपंथी आहे का असा सवाल करण्यात येतोय. 

 

नेमकं काय घडलं?

चारकोप येथील आनंदीबाई केणी या चाळीत हा धक्कादायक प्रकार घडला.

आनंदीबाई चाळीत गुरूवारी सकाळी दोन-तीन तृतीयपंथी पैसे मागत फिरत होते.

त्यातील एकनाथ शिंदे नामक तृतीयपंथीयाने चाळीतील एका घराचा दरवाजा ठोठावला आणि घरातील अल्पवयीन मुलीकडे त्याने पैसे मागितले.

पण मुलीने घरात कोणी नसल्याचं सांगितलं.

याचाच गैरफायदा घेत एकनाथ शिंदेने  घरात घुसला आणि आतून दरवाजाला कडी लावली.

या अल्पवयीन मुलीपाशी येऊन तिच्याशी अश्लील चाळे करू लागला.

याचवेळी पीडित मुलीची बहीण येऊन बाहेरून दरवाजा वाजवू लागली.

शिंदेनेच दरवाजा उघडला असता तिला घडल्या प्रकाराची कल्पना आली आणि तिने आरडा ओरडा सुरू झाला.

तेथील स्थानिकांना हा प्रकार कळल्यानंतर संतापलेल्या रहिवाशांनी या तृतीयपंथीयाला शिंदेला बेदम मारलं.

पोलिसांकडे या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यावर शिंदेला आता अटक करण्यात आली आहे.

तसंच या कृत्यामुळे हा एकनाथ शिंदे नामक इसम खरोखरच तृतीयपंथी आहे, की तृतीयपंथी असल्याचं नाटक करत आहे यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. 

नकली तृतीय पंथीय असल्याचं बनाव.

या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी चारकोप परिसरात धाव घेतली. एकनाथ शिंदे हा तृतीय पंथी आहे की नाही यांची पोलीस पडताळणी करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number