बुलढाणा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सलग दोन दिवस गारपीट सुद्धा झाली. यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर पावसाने नागरिकांचे जनजीवन ही विस्कळीत झालेय. वातावरणात गारवा पसरला असून अद्यापही पावसाचे वातावरण आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांचे पावसाने नुकसान झाले.
धारणीचे मुख्य खरीप पीक असलेले सोयाबिन अतिवृष्टीत सापडल्यानंतर हरभरा व गहू हे दोन पीक पाहून आदिवासी शेतकरी जाम खुश वाटत होता. मात्र, अखेरच्या घटकेला गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकर्यांचा पूर्ण वार्षिक हंगाम अपयशी ठरलेला आहे.अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत तेथील शेतकरी आता प्रचंड चिंतेत पडले आहे.