वृत्तसंस्था, नवी दिल्ली
चोरीच्या उद्देशाे घरात घुसलेला चोर दारु पिऊन झोपी गेल्याचा विचित्र प्रकार ऑस्ट्रेलियाच्या एका शहरात घडला आहे.
घर मालकीण घरी आल्यानंतर तिच्या खोलीत झोपलेला हा अनोखळी व्यक्तीला पाहून ती दचकली. तात्काळ या महिलेने पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती दिली.
पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या अस्पेरन्स शहरात 36 वर्षीय चोर एका घरात घुसला. मात्र, चोरी करण्यापूर्वीच त्याची नजर महागड्या शॅम्पेनच्या बाटलीवर पडली. त्यानं बाटली खोलून सर्व शॅम्पेन संपवून टाकली. मात्र एवढी शॅम्पेन प्याल्यामुळे त्याला नशा आल्याने झोप लागली.
मालकीणीच्या तक्रारनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोराला ताब्यात घेतले. दारुच्या नशेत तर्र असलेल्या या चोराला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.