महाराष्ट्रात ‘या’ 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार; जाणून घ्या

बुधवारी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील 244 प्रमुख जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच, महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे.

महाराष्ट्रात ‘या’ 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार; जाणून घ्या

मुंबई: 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष युद्धामध्ये रूपांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी, बुधवारी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील 244 प्रमुख जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच, महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे.

महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी होणार मॉक ड्रिल:

मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, धाटाव, नागोठाणे, मनमाड, सिन्नर, थळ वायशेत (रायगड जिल्हा), रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ.

हेही वाचा: भारत – पाकिस्तान तणावानंतर गृहमंत्रायलाचे निर्देश; 7 मे रोजी देशव्यापी 'मॉक ड्रिल'

नाशिकमधील 'या' ठिकाणी होणार मॉक ड्रिल:

नाशिक आणि सिन्नर येथील लष्करी छावण्या तसेच मनमाड येथील पेट्रोलियम डेपो या तीन ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे.

मॉक ड्रिलदरम्यान कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

1 – एअर रेड सायरन कसे फॉलो करावे?

2 – ब्लॅकआऊट परिस्थितीत काय करावे?

3 – प्रथमोपचाराची तयारी

4 – घरी टॉर्च असणे

5 – मेणबत्ती आवश्यक ठेवणे

6 – इलेक्ट्रॉनिक अयशस्वी होण्याच्या परिस्थितीपासून वाचण्यासाठी रोख रक्कम ठेवणे

मॉक ड्रिलमध्ये नेमकं काय होणार?

1 – हवाई हल्ल्याचे संकेत देणारे सायरन

2 – सामान्य नागरिकांना प्रशिक्षण

3 – शहरांमध्ये अचानक वीज खंडित होईल

4 – लष्करी तळ, पॉवर प्लांट यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना झाकले जाईल

काय करणे टाळावे?

1 – हवाई हल्ल्याच्या चेतावणीदरम्यान बाहेर जाणे टाळावे. त्याऐवजी घरातच राहावे.

2 – घरातील लाइट बंद करावी.

3 – सर्व दारे आणि खिडक्या बंद करावे आणि रेडिओ किंवा टीव्हीवरून मिळणाऱ्या सूचनांनुसार सतर्क राहावे.

4 – सायरन ऐकल्यानंतर आवश्यक खबरदारी घ्यावी.

5- जोपर्यंत सूचना मिळत नाही, तोपर्यंत सुरक्षित जागा सोडू नये.

मॉक ड्रिल म्हणजे काय?

मॉक ड्रिल हा एक प्रकारे पूर्वनियोजित अभ्यास असतो, ज्यामध्ये धोक्याच्या परिस्थितीचे नाट्य रूपांतर केले जाते. आपत्कालीन परिस्थितीत लोक कशी प्रतिक्रिया देतील हे या मॉक ड्रिलमधून पाहिले जाते. यादरम्यान, अचानक कुठेतरी आग लागली, दहशतवादी हल्ला झाला किंवा भूकंप झाला असे वातावरण तयार केले जाते. अशा परिस्थितीत लोकांना सुरक्षित बाहेर काढणे आणि मदतकार्य पार पाडण्याची संपूर्ण प्रक्रिया केली जाते.

jai maharashtra news

हेही वाचा: उद्या देशभरात 'मॉक ड्रिल'; मुंबईत एअर रेडचा सायरन

राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना गृहमंत्रालयाकडून आदेश:

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारत कोणत्याही क्षणी सडेतोड उत्तर देऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या संदर्भात, तीनही भारतीय सैन्यदलांनी त्यांची तयारी पूर्ण केली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे, याची चाचणी घेण्यासाठी हा मॉक ड्रिल घेतला जाणार आहे. त्यासाठी राज्यांनी पोलीस, नागरी संरक्षण यंत्रणा, आरोग्य विभाग आणि इतर आपत्कालीन सेवा संबंधित यंत्रणांना तत्पर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number