आता पाकसोबत चर्चा फक्त PoK मुद्यावर – राजनाथ सिंह

जम्मू- काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35ए रद्द केल्यानंतर आता पाकिस्तानसोबत फक्त PoK च्या मुद्द्यावर बातचीत करणार असे विधान केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या जन आर्शीवाद यात्रेत बोलताना राजनाथ सिंह यांनी वक्तव्य केले आहे. काय म्हणाले केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ? हरियाणामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार […]

आता पाकसोबत चर्चा फक्त PoK मुद्यावर – राजनाथ सिंह

जम्मू- काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35ए रद्द केल्यानंतर आता पाकिस्तानसोबत फक्त PoK च्या मुद्द्यावर बातचीत करणार असे विधान केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या जन आर्शीवाद यात्रेत बोलताना राजनाथ सिंह यांनी वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ?

हरियाणामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार असून त्यासाठी जन आर्शीवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

हरियाणात जन आर्शीवाद यात्रा आजपासून सुरुवात झाली.

यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी PoK बाबत भाष्य केले आहे.

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35ए रद्द केल्यामुळे पाकिस्तान घाबरला असून जगासमोर रडगाणे गात आहे.

पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दुर्लक्ष केल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

आम्ही सत्तेचे कधीच राजकारण केले नाही.

तसेच आम्ही कलम 370 हटवल्यानंतर पुन्हा सत्तेत येणार नाही असे अनेकांनी म्हटलं.

मात्र आमच्या जाहीरनाम्यात या विषयी लिहिले होते.

त्यामुळे आम्ही ते पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो आहेत.

कलम 370ला हात लावल्यामुळे पाकिस्तानने भारताची मोठी चूक झाल्याचे म्हटलं आहे.

तसेच आता पाकिस्तानसोबत फक्त PoK च्या मुद्द्यावर बातचीत करणार असे विधान केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number