गेले अनेक दिवस भारतीय कुस्ती महासंघ आणि महिला कुस्तीपटू यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. भारतातील अव्वल दर्जाचे कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३० कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले. परंतु हे सर्व कुस्तीपटू आता नोकरीत रुजू झाल्याने अनेक वृत्त समोर येत होती. परंतू, साक्षी मलिकने आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त फेटाळले आहे.
यानंतर साक्षी मलिक, विनेश फोगाटआणि बजरंग पुनिया हे पुन्हा नोकरीत रुजू झाले आहेत. त्यामुळे, वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून कुस्तीपटूंनी आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त समोर आले होते. परंतू, लढा शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच राहणार असे म्हणत साक्षी मलिकने आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त फेटाळले आहे.
आंदोलनातून माघार घेतल्याची ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. न्यायाच्या लढाईत आमच्यापैकी कोणीही मागे हटले नाही आणि हटणारही नाही. सत्याग्रहासोबतच मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार. कृपया कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका. असे ट्विटही साक्षी मलिकने केले आहे.