मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीचा मुहूर्त लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने आजचा रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला आहे.
केवळ हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी. 4.10 या दरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार मध्य, पश्चिम रेल्वेवर आज रात्री मेगाब्लॉक घेतला जाणार असून हार्बर मार्गावर उद्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी ते वांद्रे रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
तसेच सीएसएमटी ते वाशी-बेलापूर-पनवेल रेल्वे मार्गावर सकाळी 11.34 ते दुपारी 4.23 पर्यंत आणि सीएसएमटी ते वांद्रे-अंधेरी-गोरेगावपर्यंत सकाळी 9.56 ते दुपारी 4.16 पर्यंतच्या रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेने इगतपुरी येथे सिग्नल यंत्रणेत नव्याने बदल करण्यासाठी आज ब्लॉक घेतला आहे. दुपारी 3.45 ते रात्री. 1.45 पर्यंत हा ब्लॉक चालेल. या कालावधीत अनेक गाड्या रद्द होणार आहेत. तसेच मेल, एक्स्प्रेस अर्धा तास ते सव्वा तास उशिराने धावतील.